धाराशिव (प्रतिनिधी)- एस. टी. आरक्षण निर्णयाची अंमलबजावणी करून प्रमापपत्र देण्यात यावे या मागणीसाठी सकल धनगर समाजाचे 4 युवक धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना सकल मराठा समाजाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी मनोज जरांगे पाटील व उपोषणाला बसलेल्या युवकांबरोबर भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यावेळी जरांगे पाटील यांना गेल्या 70 वर्षापासून घटनेत दिल्या आरक्षणाची राज्यकर्त्यांनी अंमलबजावणी केली नाही असे शाम तेरकर यांनी सांगितले. जरांगे पाटील यांनी धनगर समाजाची एस. टी. आरक्षणाची मागणी योग्य असून, माझ्या तुम्हाला पाठिंबा आहे असे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी तेरकर यांना सांगितले.

सकल धनगर समाजाच्यावतीने गेल्या तीन दिवसापासून एस. टी. आरक्षण प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी शाम तेरकर, कमलाकर दाने, समाधान पडूळकर, राजू मैदाड धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला असेल आहेत. गेल्या तीन दिवसात खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकट गुंड, सुधीर पाटील, ढोकी ग्रामपंचायतचे सरपंच अमोल समुद्रे, सकल मराठा समाजा धाराशिव, सकल मराठा समाज तुळजापूर, धनजय शिंगाडे, रिपाइं आठवले गटाचे राजाभाऊ ओव्हाळ आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून पाठिंबा दर्शविला आहे. 

यावेळी सकल मराठा समाज तुळजापूरचे कुमार रामभाऊ टोले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून मराठा समाजाचा पाठिंबा जाहीर केला. यावेळी जरांगे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून उपोषणकर्ते शाम तेरकर यांच्या चर्चा केली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाची एस. टी. आरक्षणाची मागणी योग्य आहे. या संदर्भात मी माध्यमांशी ही बोलतो. उपोषणकर्त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले. यावेळी शाम तेरकर यांनी उपोषणस्थळी भेट देण्याची विनंती केली. धाराशिव जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून तहसीलदार यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. आपल्या मागण्या राज्य शासनाकडे पाठविण्यात येतील असे सांगितले. 


 
Top