धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरातील भीम नगर येथील रहिवासी मयूर बापू बनसोडे (वय 31 वर्ष )यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी 4 जुलै रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता बौद्ध स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.शहरातील उद्योजक बापू सखाहरी बनसोडे यांचे ते सुपुत्र होते.