तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यासंदर्भात शासकीय विश्रामगृह, शिंगोली येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची  तुळजापूर पुजारी मंडळासोबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाले. या बैठकीत पुजारी मंडळाच्या विविध मागण्या, अडचणी आणि अपेक्षांवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या अडचणी आणि सुचना लेखी स्वरूपात द्या. आपणास लेखी उत्तर दिले जाईल असे सांगितले. 

यावेळी पुजारी मंडळाच्या सर्व मागण्या, अडचणी आणि सूचना त्यांनी विस्ताराने लेखी स्वरूपात द्याव्यात, तसेच या मागण्या समजून घेत प्रशासनाकडून लेखी स्वरूपात उत्तर दिले जाईल, अशी चर्चा झाली.  श्री तुळजाभवानी मंदिराच्या ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्वाचा विचार करून या मंदिराचा विकास सर्वांच्या सहकार्याने, पारदर्शकतेने आणि सर्व परंपरांचे पालन करून व्हावा यासाठी आपण कटिबद्ध आहोत बाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगीतले.

या चर्चेमुळे समन्वयाची भावना अधिक दृढ झाली असून, भविष्यातील निर्णय प्रक्रियेत सर्व संबंधितांची मते आणि भावना योग्य त्या पद्धतीने समजून त्यावर उपाययोजना करण्याबाबत पावले उचलली जातील असे सांगण्यात आले. सदरील बैठकीस तिन्ही पुजारी मंडळ पाळीकर, भोपे, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष, पुजारी सदस्य,माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी सह पुजारी बांधव उपस्थितीत होते.


 
Top