धाराशिव (प्रतिनिधी)-आपल्या देशातील शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करून स्वयंपूर्ण करण्यासाठीचा अर्थसंकल्प  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला आहे. शेतकऱ्यांच्या  शेतीला नैसर्गिक शेती बनवून त्याचबरोबर डाळीचे उत्पन्न व तेलबिया यांच्यामध्ये स्वयंपूर्णता येण्यासाठी आधुनिक बी बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा याच्यासाठीही प्रयत्न करणारा हा अर्थसंकल्प असून याच्यातून  शेतीतील मालवाहतुकीलाही प्राधान्य दिले जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड इत्यादी सह अनेक योजना शेतीमध्ये राबवून भारताचा शेतकरी मजबूत झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत आहे. या योजनेसह उद्योग आरोग्य शिक्षण बेरोजगार कौशल्य विकास गरिबांना मोफत घरे ऊर्जा क्षेत्रात सूर्यघर योजना सह अशा अनेक योजना आपल्या देशामध्ये राबवून सगळ्यांनाच नव संजीवनी देण्याचे काम केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले असून सगळ्यांना जवळचा वाटणारा अर्थसंकल्प असून यामुळे निश्चितच आपला देश विकासामध्ये गती घेईल असा अर्थसंकल्प आहे.                                                  

-   रामदास कोळगे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव 

 
Top