धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय जे सतत विद्यार्थ्यांना रोजगार देण्या मध्ये अग्रेसर असते त्या महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा संगणक विभागाचा प्रथमेश कुपाडे याची टी सी एस या नामांकित कंपनी मध्ये निवड झाली आहे. मुलांना रोजगार सक्षम करणे आणि येण्याऱ्या कालावधीत रोजगार साठी लागणारे कलाकौशल्य शिकवणे या साठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करत आहे.  त्यामुळे तेरणा  महाविद्यालयाचे विद्यार्थी आपले कौशल्य सिद्ध करत या स्पर्धेच्या युगामध्ये जास्तीत जास्त पॅकेज मिळवत आहेत. तसेच दिवसेंदिवस प्लेसमेंट ची संख्या वाढत असून सर्व सरासरी पॅकेज मध्ये ही वाढ होत आहे. प्रथमेश कुपाडे याच्या सत्काराच्या वेळी  “येणार काळ कितीही कठीण असला तरी आम्ही मुलांना रोजगार सक्षम करतो “ असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयामध्ये टीसीएस च्या वतीने मागील दहा वर्षापासून टाटा अफेरमेटिव्ह ॲक्शन प्रोग्राम या उपक्रमांतर्गत हजारो विद्यार्थ्यांना   इंडस्ट्रीज रेडी इंजिनिअर होण्यासाठी व नामांकित कंपन्यांमध्ये सर्वोच्च पॅकेज मिळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे या महाविद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांना  टीसीएस आयबीएम, टेक महिंद्रा, इन्फोसिस, कॅपजमिनी टाटा कम्यूनिकेशन्स असेंचर, विप्रो, रिलायंस जिओ, सिस्कोया सारख्या नामांकित आयटी  कंपन्यामध्ये चांगल्या पगारावर नोकऱ्या मिळाल्या आहेत.

प्रथमेश कुपाडे हा महाविद्यालयात शिकत असल्यापासून एक होतकरू ,अभ्यासू ,शिस्तप्रिय विद्यार्थी अशी ओळख होती. अभ्यासाबरोबरच कॉलेज मधील अनेक स्पर्धेत ,शिबिरात ,चर्चसत्रात त्याचा सहभाग कायम असायचा.  माझ्या ह्या यशात महाविद्यालयातील शिक्षक वर्गाने केलेल्या मार्गदर्शनाचा भरपूर उपयोग झाला असे प्रथमेश कुपाडे याने व्यक्त केले.  तेरणा ट्रस्ट चे अध्यक्ष माननीय डॉ. पदमसिंह पाटील, ट्रस्टी  आमदार राणाजगजीतसिंह पाटील, मल्हार पाटील, मेघ पाटील,तेरणा ट्रस्टचे समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर  प्रा.अशोक जगताप, डॉ. एस. एन. होळंबे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 
Top