कळंब (प्रतिनिधी)-  डॉ. स्वप्नील सुरेश उगले यांनी मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एमपीएससीत यश संपादन केले आहे. कळंब तालुक्यातील सातेफळ सौंदाना या ग्रामीण भागातील डॉ. स्वप्नील उगले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठे यश मिळवलं आहे. 

जिद्द, अभ्यास करण्याची तयारी मेहनत घेण्याची तयारी आणि चिकाटी असेल तर कोणतीही कठीण गोष्ट सोपी होते. हेच स्वप्नील यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे झाली आहे. सातेफळ येथील डॉ. स्वप्नीलचे प्राथमिक शिक्षण लता मंगेशकर तर माध्यमिक शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यालय कळंब व उच्च माध्यमिक शिक्षण चंद्रभान सोनवणे महाविद्यालय लातूर येथे झाले. त्यांनतर एमबीबीएस ही पदवी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथून प्राप्त केली. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेत ते लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथून एम एस सर्जन झाले. काही कालावधी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे सेवा दिली. त्यानंतर नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांची शासकीय रुग्णालय धाराशिव येथे सहाय्यक प्राध्यापक पदी निवड झाली आहे. डॉ. स्वप्निल यांच्या पत्नी डॉ. शितल उगले या एमडी असून त्यादेखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सेवा देत आहेत. डॉ. स्वप्नील उगले यांच्या या यशाबद्दल सातेफळ ग्रामस्थ व मित्रपरिवार यांच्यावतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 
Top