धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व गोशाळा,संस्था चालक, जिल्ह्यातील सर्व गोरक्षक ,सर्व हिंदुत्ववादी संघटना,यांच्या वतीने अमरण उपोषण दि.29/07/2024. पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर पाच जंनानी अमरण उपोषण सुरू केले होते . आज दि 31 जुलै रोजी प्रशास माने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले आहे तर 15 ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहनाचा करण्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे.

गोशाळा संस्थेतील प्रति दिन, प्रति गोवंश 100. रुपये अनुदान मिळावे,  गोरक्षकांना जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत ओळखपत्र व सुरक्षा मिळवी ,  प्राणी क्लेश समिती ची स्थापन  करणे, गोशाळेतील पशूंना चरण्यासाठी गायरान,पड गायरान,वनीकरण इ.शासकीय जमिनी चरण्यासाठी किंवा चारा उगवण्यासाठी देण्यात याव्यात. गोवंशांची क्रूरपणे कत्तलीसाठी  अवैध वाहतूक करणारे वाहन, गोवंश व संबंधित आरोपींना पोलीस स्टेशन मधून कोर्टाचा आदेशाशीवाय कुठल्याही अटी शर्ती वर सोडू नये, व आदेश गोवंश हत्या बंदी कायद्याची अंमल बजावणी करावी व जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन ला त्याचे आदेश देण्यात यावे. धाराशिव जिल्ह्यतील सर्व अवैध कत्तलखाने जिल्हा प्रशासनाने तात्काळ बंद करण्यात यावेत, व गोरक्षकांवर वारंवार हल्ले करणाऱ्या सराईत कसायांवर कायदेशीर कार्यवाही करावी. अशा मागण्या साठी  गोरक्षकांनी आमरण उपोषण सुरू केले होते.  प्रतिदिन कधी गोवंश शंभर रुपये देण्याची मागणी प्रशासनाने वरी प्रशासनाला कळविली आहे व स्थानिक येथील सर्व मागण्या प्रशासनाने मान्य केल्याचे प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी दिली आहे. 

 महाराष्ट्रात गोहत्या बंदी चा कायदा असून देखील आणि आपल्या हिंदू धर्मात गोमतेला आई चा दर्जा आहे तरी ही गोमाता मोठ्या प्रमाणात कत्तलसाठी जाते यावर कुठे तरी सकल हिंदू समाजानी विचार केला पाहिजे यासाठी अमरण उपोषणाचा लढा सुरू कले होते यासाठी महाराष्ट्रातील सर्व हिंदुत्ववादी संघटना, गोपालक, गोसेवक, गोरक्षक, शिवभक्त सर्वांनी या लढ्याला यश मिळवण्यासाठी पाठिंबा दिला या सर्वांचे आभार देखील उपोषणकर्त्यांनी  मानले आहेत.

नवजीवन गोशाळा, वैशालीताई बारकुल, प्रशांत मगर,श्री स्वामी समर्थ गोशाळा, गणेश सदाफुले, श्रीकृष्ण गोशाळा , भाऊसाहेब तंबिले, शिवनंदी गोशाळा तुळजापूर येथील रोहित बागल,चेतन माने, ज्योतिबा मुळे,सुदर्शन पंडित,ज्ञानराज गुंड अभिजीत कदम, सुरत गायकवाड,अनिल पवार , श्रीकांत खरटमोल, राम त्रिवेदी हे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणा स्थळी उपस्थित होते.

 
Top