धाराशिव (प्रतिनिधी)- गेली अनेक वर्ष तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात होता परंतु गतीने विकास झाला नाही. त्यामुळे मतदारसंघातली जनता विकासापासून वंचित आहे.या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मजबूत ताकद आहे व कार्यकर्त्याच्या संघटन आहे गेल्या पंचवार्षिक पासून या मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार कार्यरत आहेत परंतु तरीही त्यांच्याकडे सत्ता असून मतदारसंघाने विकासाकडे वाटचाल केली नाही याची खंत जनतेच्या मनात आहे. आमदार मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव भाजपमध्ये गेल्याने मधुकरराव चव्हाण निवडणुकीच्या स्पर्धेतून बाहेर आहेत. कुठल्याही परिस्थितीत 2024 ची तुळजापूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढणार आहे. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते पृथ्वीराज आंधळे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे अनेक युवा नेतृत्व असणारे सक्षम नेते आहेत. प्रतापसिंह पाटील, सक्षणाताई सलगर, जीवनराव गोरे, अशोक जगदाळे, धैर्यशील पाटील, शाम घोगरे व अनेक, सध्या या मतदारसंघांमध्ये काँग्रेसची ताकद नगण्य आहे. अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या तक्तीचे पाठबळ काँग्रेसच्या पाठीशी असल्यामुळे त्यांना विजय संपादित करता आला. परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या मागणीची दखल घेऊन व जनतेच्या अग्रस्तव व जनतेला असलेले युवा नेतृत्वाची गरज हे लक्षात घेऊन  या मतदारसंघांमध्ये असलेलं संघटन पाहता यावेळेस तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आम्ही लढवण्याचे निश्चित केले आहे.

त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते सक्रिय देखील झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील कुठलीही शंका न बाळगता आतापासूनच कामाला लागावे व झेंडा फडकवण्यासाठी सज्ज राहावे. लोकसभेत पन्नास हजार मतांनी तुळजापूर विधानसभा मायनस होता ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असलेले सक्रिय कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यामुळे ते शक्य झाले. हा अनुभव पाहता अनुभव पाहता, पूर्ण तयारीनिशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठल्याही परिस्थितीत तुळजापूर विधानसभेची निवडणूक लढणार आहे. नुरा कुस्तीत होऊ देणार नाही. तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा उभारण्याची ताकद युवा नेतृत्वाने उभी केलेली आहे.

 
Top