तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथे स्मशानभूमीला जागा देण्याची मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतकडे निवेदनाद्वारे केली आहे.        

निवेदनात म्हटले आहे की, तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिराजवळील सद्यस्थितीत स्मशानभूमी ही नदीमध्ये आहे.अंत्यविधी करताना प्रेत घेऊन जाण्यासाठी, लोकांना बसण्यासाठी, उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.तसेच नदिला पूर आला असता अंत्यविधीसाठी अडचण येत आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीतील स्मशानभूमीचे बांधकाम हे जीर्ण झालेले आहे. तेर मधील जवळपास सर्वच हिंदू समाजातील 90 टक्के अंत्यविधी हे याच स्मशानाभूमीत होतात. म्हणून विनंती की, श्री संत गोरोबा काका नगर प्लॉटीग मधील चार किंवा पाच गुंठे मोकळी जागा नविन स्मशानभूमी बांधकामासाठी, सुशोभीकरणासाठी सोडावी किंवा द्यावी अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर सचिन देवकते, तानाजी पिंपळे, रतन नाईकवाडी, राजकुमार थोडसरे, केशव सलगर व नागरीकांच्या सहया आहेत.

 
Top