धाराशिव (प्रतिनिधी) -,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा सचिन खरात हे पक्ष स्थापनेपासून (स न 2012) आजतागायत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करून अनेक निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सोबत आहेत. सचिन खरात हे तरुण व धाडसी नेतृत्व असून त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला आहे. म्हणून त्यांना राज्याच्या उच्च सभागृहामध्ये विधानपरिषदेवर घेऊन आमदार म्हणून निवड करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येत्या जुलै महिन्यामध्ये राज्यपालाच्या कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार निवडून देण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सचिन खरात हे बौद्ध समाजावर होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देऊन तात्काळ शासन दरबारी न्याय मागण्याचे काम केले. तसेच सामाजिक प्रश्न व फुले,शाहू,आंबेडकर,यांचे विचार तळागाळातल्या समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची बाजू घेऊन सातत्याने विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचे काम केले आहे. लोकसभा, विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था,या सर्व निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष आपल्या बाजूने पाठिंबा देऊन सोबत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पाठिंब्यामुळे आपल्याला सत्तेमध्ये सिंहाचा वाटा मिळाला असल्याने अशा तरुण व धाडसी नेतृत्वाला राज्याच्या उच्च सभागृहामध्ये सर्व बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार म्हणून निवड करून सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केली आहे.