परांडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील टाकळी ग्राम पंचायतच्या विद्यमान सरपंच सौ.अशा विनायक चौधरी यांनी नातवाच्या वाढदिवसावर होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना दि.24 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप व शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करून नातवाचा वाढदिवस साजरा केला .

आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीना गणवेश वर बेल्ट, टाय तसेच ओळख पत्र नाही ही गरज ओळखुन सरपंच सौ.आशा विनायक चौधरी यांचे चिरंजीव कृष्णा विनायक चौधरी यांनी परिवारासह  वाढदिवसानिमित्त टाय, बेल्ट, ओळखपत्र आणि खाऊचे वाटप करून शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करून एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर काळे, शालेय समिती अध्यक्ष संतोष लोंढे, घनःश्याम शिंदे, विनायक चौधरी, राजकुमार गरड, कृष्णा चौधरी, हनुमंत काळे, नामदेव काळे, लक्ष्मण काळे, रमेश अहिरे, विलास मिस्किन, पिंटू माळी, पांडुरंग भोरे, अण्णा काळे, सदाशिव काळे, दिलीप पवार, शामराव पवार,  मुख्याध्यापक बरचे सर, खराडे सर, गंभीरे सर, मुख्याध्यापक संतराम काळे सर , सोमनाथ ठाणेकर, विठ्ठल काळे, रुपेश बनसोडे यांच्या सह विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top