धाराशिव  (प्रतिनिधी)-   केंद्र सरकारने देशाचा अर्थसंकल्प सादर केला. परंतू देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र दिसला नाही. महाराष्ट्र द्वेशी अर्थसंकल्प असून याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.24) जिल्हाधिकारी कार्यालयासमारे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, काल केंद्र सरकारने देशाचा अर्थसंकल्प सादर केला. परंतू देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र दिसला नाही, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. कारण या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी ठोस निधी दिलेला दिसत नाही. परंतू भाजप प्रणीत आंध्र प्रदेश व बिहार राज्यांना दिलेली लक्षणीय मदत महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय करणारा आहे. महाराष्ट्रातील जनता आपल्यावरील अन्याय सहन करणार नाही. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला, दलीत, मागास, भटके, अल्पसंख्यांक या सर्वांना हा अर्थसंकल्प महाराष्ट्रावर अन्याय करणारा वाटतो आहे. त्यामुळेच केंद्र सरकारचा राष्टवादीच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी राष्टवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर, नरदेव कदम, मेजर सावंत, डॉ. ताडेकर, भारत शिंदे, सागर चिंचकर, बिलाल शेख, इकबाल पटेल, गौतम क्षिरसागर, शाम पाटील दुधगावकर, श्रीकांत धाबेकर, राहुल धाबेकर, दौलत गाढवे, औदुंबर धोंगडे, शंकर कदम, संभाजी धोंगडे, रामराजे धोंगडे, परमेश्वर येवले, बाबासाहेब धोंगडे, महादेव धोंगडे, प्रमोद तौर आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 
Top