धाराशिव (प्रतिनिधी)- एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर वैधता प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अदा करा, अशी मागणी  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वार दि. 11 जुलै रोजी मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र एसईबीसी  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यायसायिक प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता 2024 पासुन आरक्षण लागू केलेले आहे व आवश्यक कागदपत्र सादर करण्याकरिता 28 जून रोजी परिपत्रक निर्गमित केलेले आहे. यावेळी युवक प्रदेश सरचिटणीस आदित्य गोरे, ज्ञानेश्वर निंबाळकर, रितेश अखाडे, उज्वल जाधव, दादा सुरवसे यांच्यासह विद्यार्थी  उपस्थित होते.


 
Top