धाराशिव (प्रतिनिधी)-  अफगाणिस्तान व इतर देशातून कांदा आयात करणे तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे.

या पत्रकार दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, मागील वषार्पासून निर्यातीवर वेगवेगळे निर्बंध लादले होत. कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क व 550 डॉलर्स किमान मूल्य या अटी लागू करून निर्यात बंदी सरकारने हटवली होती. ज्यामुळे शेतकयांना कांद्याचे चार पैसेही मिळाले नाहीत. कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला. केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क व 550 डॉलर्स किमान निर्यात मूल्य हे तात्काळ हटवून कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी उठवावी. ज्यामुळे शेतकयांच्या कांद्याला योग्य दर मिळेल व शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. तरी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन संबधितांना आदेशित करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली आहे.

 
Top