ढोकी (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेश नगर ढोकी येथे जानेवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या नॅशनल स्कॉलर सर्च एक्स्झाम (एनएस एसई) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समिती व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल, व प्रमाणपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला.

या परीक्षेत सर्वाधिक गुण घेणारे आरहान शेख व सफीना अत्तार यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन. तर आलिया शेख, अलिझा काझी, आर्यन धावारे, मानवी लोखंडे यांना मेडल व प्रमाणपत्र. तसेच सायमा पठाण, अलिसा शेख, अहिला कोतवाल, बुशरा तांबोळी, प्राची माळी, प्रियल सुतार, काव्या लोखंडे, जानवी लोखंडे, बालाजी सुतार, अजिंक्य माळी, प्रथमेश जावळे, सृष्टी सोनवणे, व इरफान कोतवाल या विद्यार्थी यांना प्रमाणपत्र देत यांचा ढोकीच्या सरपंच अश्वीनी माळी, माजी प.सं सदस्य संग्राम देशमुख, तेरणा नगर बिटचे खुणे सर, विद्यानंद गायकवाड, मुसा शेख,सोनाळे अप्पा यांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापिका श्रीमती आर. बी. पठाण, शिक्षिका श्रीमती आर. डी. गायकवाड, श्रीमती सुनीता मस्कर, प्रताप धावारे, काजल ससाणे यांचा सह माता पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top