धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभागा मार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी स्टेट सीईटी सेल आणि डी. टी. ई. यांनी जाहीर केलेल्या प्रवेश प्रक्रिये बाबत माहिती, तसेच कागदपत्र पडताळणी केंद्राची सुरुवात व्यवस्थापन शास्त्र विभागांमध्ये झाली आहे.
धाराशिव जिल्हा आणि परिसरातील विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी आता जिल्ह्यामध्येच ऑनलाइन तथा ऑफलाईन सुविधा उपलब्ध झाली आहे. स्टेट सीईटी सेल आणि डी. टी. ई. यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार 2024 ची प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी चालू आहे. यानंतर मीरिट लिस्ट आणि त्यानंतर विविध कॅप राऊंड मार्फत प्रवेश प्रक्रिया पार पडली जाते. कॅप राऊंड मध्ये मिळालेल्या विद्यापीठ किंवा महाविद्यालयात दिलेल्या वेळेमध्ये संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पार पाडावी लागते. सदर प्रक्रिया साधारणपणे तीन महिने चालत असते यामुळे वेळापत्रकानुसार प्रक्रियेमध्ये एखादी गोष्ट राहून गेल्यास विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया मधून बाहेर पडतो. म्हणून धाराशिव जिल्हा आणि परिसरातील विद्यार्थ्यांना या सर्व प्रक्रियेबाबत विस्तृत माहिती सदर समुपदेशन केंद्रामार्फत दिली जाते. एम. बी. ए. साठी कागदपत्र पडताळणीची शेवट तारीख 22 जुलै 2024 आहे. सदर समुपदेशन केंद्राचा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करून घ्यावा आसे अवाहन विद्यापीठ उपपरिसर धाराशिव चे संचालक डॉ. प्रशांत दीक्षित आणि व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांनी केले आहे. सदर समुपदेशन केंद्राचे समन्वयक म्हणून प्रा. सचिन बस्सैये कार्य करत आहेत.