धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ शुक्रवार, 5 जुलै रोजी येरमाळा (ता.कळंब) येथे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित माता, भगिनींना माहिती दिली. नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे आणि नोंदणी कशा पद्धतीने करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. दिवसभरात मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोंदणी अर्ज भरुन घेण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन येरमाळा येथील युवासेना उपजिल्हाप्रमुख सुहास बारकुल, संजय बारकुल यांच्यासह शिवसैनिकांनी केले होते.

 
Top