धाराशिव (प्रतिनिधी)- वसतिगृह योजनेपासुन वंचीत असलेल्या इतर मागास मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती (धनगर वगळुन) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्येाती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2024-25 या वर्षापासून राबविण्यात येत आहे.
शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायीक महाविद्यालय /तंत्रनिकेतनांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह योजनेपासुन वंचित असलेल्या वरील प्रवर्गातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासुन वंचित राहु नये यासाठी स्वतंत्र वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागु केली आहे.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रथम वर्षात,द्वितीय वर्षात,तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक 150 विद्यार्थ्यांना या प्रमाणे प्रति जिल्हा 600 विद्यार्थ्यांना वसतीगृह योजनेचा लाभ देण्याची प्रक्रीया सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी “ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी अर्ज विहित मुदतीत सादर करावे.यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.उच्च शिक्षणाच्या दितीय,तृतीय, चतुर्थ वर्ष-31 जुलै-2024 अर्ज स्विकारले जातील.16 ऑगस्ट-2024 रोजी निवड यादी जाहीर करण्यात येईल.उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी- 5 ते 20 ऑगस्ट-2024 या कालावधीत अर्ज स्विकारले जातील.निवड यादी 2 सप्टेंबर-2024 रोजी
योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण,धाराशिव यांच्या कार्यालयाकडे विहित मुदतीत सादर करावे.योजनेच्या विस्तृत अटी व शर्तीच्या माहितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला,धाराशिव येथील सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय,धाराशिव येथे संपर्क साधावा.असे आवाहन सहाय्यक संचालक बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.