धाराशिव (प्रतिनिधी)- समाज म्हणून नव्हे तर ओबीसी म्हणून सर्वांनी एकत्रित यावे तरच आरक्षण टिकेल असे मत शिष्टमंडळाशी बोलताना ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी एससी,एसटी, ओबीसींच्या हक्काची आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे. धाराशिव येथे ओबीसी शिष्टमंडळा सोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी धनंजय शिंगाडे, धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत, नाभिक महामंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण माने, भावसार समाजाचे मिलिंद लांडगे, माळी समाज संघटनेचे राजाभाऊ माळी,परिट समाजाचे नेते हरिदास शिंदे, इलियास भाई मुजावर यांच्यासह समाज बांधवांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
ओबीसी आरक्षण बचाव अभियानच्या निमित्ताने ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी धाराशिव येथे ओबीसी बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. औरंगाबाद येथे 7 तारखेला होणाऱ्या सभेतून ओबीसींची ताकद दाखवण्याची संधी आहे. मराठा आणि ओबीसी यांच्या आरक्षणाचे ताट वेगवेगळे असले पाहिजे. सरकारे मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे यासाठी ओबीसी समाज बांधवांनी एकत्रित यावे लागलं.ओबीसी चे आमदार निवडून आल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही अशी भूमिका आंबेडकर यांनी मांडली. तरी 7 ऑगस्ट रोजी एससी एसटी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा समारोप आहे.लाखोंच्या संख्येने समाजाने उपस्थित रहावे असे आंबेडकर यांनी बैठकीत आवाहन केले.