धाराशिव (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारची अतिशय महत्वकांक्षी योजना आहे.जिल्ह्यातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहे.त्यांना अर्ज भरण्यासाठी देखील मदत करण्यात येत आहे. या योजनेच्या अटी व निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रत्येक पात्र महिला लाभार्थीच्या आधार सलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.वर्षाला 18 हजार रुपये पात्र महिलेच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

जिल्ह्यात 4 लाखापेक्षा जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.27 जुलैपर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील 1 लाख 79 हजार 995 महिलांचे अर्ज प्राप्त झाले.यामध्ये ग्रामीण भागातील 1 लाख 70 हजार 7 आणि शहरी भागातील 9988 महिलांच्या अर्जाचा समावेश आहे. ऑनलाईन अर्जाची संख्या 50 हजार 777 आणि 1 लक्ष 29 हजार 218 ऑफलाइन अर्जाचा समावेश आहे. 

तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पात्र आणि अपात्र अर्जाची छाननी करण्यासाठी तालुका समिती गठित करण्यात आली.तालुका समितीने ग्रामीण भागातील 95 हजार 265 आणि शहरी भागातील 2702 अर्जाना मान्यता दिली आहे.अशा एकूण 97 हजार 967 अर्जाना समितीने मान्यता दिली आहे. 27 जुलैपर्यंत ग्रामीण भागातून 1 लाख 70 हजार 7 आणि शहरी भागातील 9988 महिलांचे असे एकूण 1 लाख 79 हजार 995 अर्ज प्राप्त झाले.ग्रामीण भागातील 46 हजार 455 आणि शहरी भागातील 4322 अशी एकूण 50 हजार 777 महिलांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले. ग्रामीण भागातील 1 लाख 23 हजार 552 महिलांचे आणि शहरी भागातील 5666 महिलांचे असे एकूण 1 लाख 29 हजार 218 ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले. 

तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समितीने बाल विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या अर्जाला मान्यता दिली.ती पुढीलप्रमाणे भूम - 11 हजार 250, कळंब -14 हजार 16,धाराशिव व तेर -17 हजार 33, तुळजापूर - 14 हजार 48,उमरगा व आलूर - 13 हजार 400, परंडा - 11 हजार 963, लोहारा - 8126 आणि वाशी - 5409 अशा एकूण 95 हजार 265 ग्रामीण महिलांच्या तर शहरी भागातील 2702 महिलांच्या अर्जांना मान्यता मिळाली. 

 
Top