तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब तर्फे प्रती वृर्षी डोंगरी व दगडधोड्यांचा भागात ब्लास्टींग टँक्टटर माध्यमातून खड्डे घेवुन   वृक्षारोपण करतात. यंदाही पाचशे वृक्ष लागवडचा दुसऱ्या टप्याचा शुभारंभ पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या हस्ते 111 वृक्षारोपण करुन करण्यात आला.

राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब मागील  तीन वर्षापासुन खेळाबरोबर वृक्षारोपन करुन पर्यावरण समतोल साधण्यासाठी वृक्षारोपन करुन त्याची देखभाल करीत आहे. त्यांनी मागील तीन वर्षा पासुन लावलेले हे वृक्ष जवळपास दहा फुट उंची पर्यंत वाढले आहेत.

ज्या  ठिकाणी कुठलीही माती, मुरूम नाही फक्त पाषाण आहे अशा ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. त्यानंतर लवकरच दुसऱ्या डोंगराच्या भागात यावर्षी पाचशे वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. याचा शुभारंभ 111 वृक्ष लावण्यात येवुन करण्यात आला. या वृक्षारोपन कार्यक्रम यशस्वीतेसाठी टीमचे नितीन सूर्यवंशी, बबलू सरवदे, अमर गायकवाड, अमोल सुरवसे, सचिन शिंदे, सुरज चौगुले, सिद्धी कदम, धनंजय सावंत, किरण कदम, महेश पुजारी, शुभम जगताप, प्रसाद डांगे, समाधान सर, ऋषिकेश साळुंखे, अतुल साठे, दीपक गोसावी, स्वरूप पवार, यश कदम, ओम शेळके, जॉन इत्यादी सदस्य परिश्रम घेत आहेत.


दगडधोंड्यांचा भागात वृक्षारोपन

जिथे मुरूम किंवा माती असे काही नाही. फक्त पाषाण दगड आहेत. अशा ठिकाणी ब्लास्टिंग ट्रॅक्टर लावुन खड्डे घेवुन त्या खड्यात वृक्षारोपण केले असुन ते लावलेले वृक्ष यशस्वी वाढुन तो परिसर वृक्षाने बहरुन गेला आहे.

 
Top