कळंब (प्रतिनिधी)- गेल्या सहा वर्षा पासून वारकऱ्या साठी चहा बनवण्याचे काम करणारे भैय्या बावीकर हे वारी घडल्याचे समाधान मिळत असल्याचे सांगतात.
लाखो वारकर्यांचे श्रद्धास्थान असलेला विठ्ठलाच्या दर्शना साठी जाणाऱ्या वारकऱ्यांची,आपापल्या परीने शेकडो जण सेवा करण्यात धन्यता मानतात. वारी येथे जाणे नाही झाले तरी हि सेवा महत्वाची मानली जाते. कळंब मार्गे शेकडो दिंड्या पंढरपूर कडे जातात,अन्नदान मोठ्या प्रमाणावर केले जाते.आषाढी एकादशी च्या आदल्या दिवशी गजानन कट्टा व जीवराज प्रतिष्ठान कडून दिवसभर वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांना दही, पोहे व चहा दिला जातो. यासाठी गेल्या सहा वर्षा पासून गजानन डेअरीचे संचालक व भाजपचे शहराध्यक्ष भैय्या बावीकर हे वारकरी मंडळीसाठी चहा बनवण्याचे काम करतात. यातच खूप समाधान मिळत असल्याचे ते सांगतात. वाहनाने प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना वाहने थांबवून माउली माऊली म्हणत आग्रहाने दही पोहे, चहा दिला जातो. अंदाजे तीन ते चार हजार वारकरी याचा स्वाद घेतात.