धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सर्वांसाठी समृद्ध महाराष्ट्रासाठी या विषयावर ऑनलाइन संवाद कार्यशाळा संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये चालू शैक्षणिक वर्षात शंभर टक्के लाभ देण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात विद्यार्थिनींच्या संवाद कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेसाठी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी मधील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सदर कार्यशाळेचे संयोजन अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. एस एस फुलसागर, सह समन्वयक डॉ. संदीप देशमुख यांनी केले. सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .