भूम (प्रतिनिधी)-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भूम तालुक्यामध्ये भगवा सप्ताह व शिवसंपर्क अभियानाची सुरुवात झाली आहे. वाढदिवसानिमित्त आलमप्रभू देवस्थान या ठिकाणी महाआरती करून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातुन पुन्हा विधान सभेवर भगवा फडकवून पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून प्रार्थना केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून व शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख सुनील काटमोरे  यांच्या सूचनेवरून तालुक्यांमध्ये भगवा सप्ताह व शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी विधानसभा समन्वयक दिलीप शाळू, महिला आघाडी जिल्हा संघटक जिनत सय्यद, भूम तालुका प्रमुख ॲड श्रीनिवास जाधवर, विधानसभा प्रमुख युवासेना  प्रल्हाद आडागळे, महिला आघाडी तालुका संघटक उमादेवी रणदीवे, उपतालुका प्रमुख रामभाऊ नाईकवाडी, भगवान बांगर, माजी शहर प्रमुख दिपक मुळे, भास्कर वारे,  ॲड विनायक नाईकवाडी, बाबूराव सपकाळ, माऊली खंडागळे, विठठल सुरवसे बंडू भोसले यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते. भूम तालुक्यातील जेजला येथील जि .प .शालेय शिक्षण समितीवर बंडू भोसले यांची अध्यक्षपदी व किरण पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतिने सत्कार करण्यात आला आहे.

 
Top