कळंब (प्रतिनिधी)- काल संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प सार्वजनिक आरोग्य सेवे साठी खुपच निराशाजनक ठरला असुन केवळ 10 ते 12% वाढ केल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे या अर्थ संकल्पात सार्वजनिक आरोग्यासाठी विशेष असे काही निधीची तरतूद केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे हा अर्थ संकल्प सार्वजनिक आरोग्यासाठी निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया आयएमए चे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी व्यक्त केले.
कॅन्सर वरील केवळ तीनच औषधांवरील अबकारी कर हटविला असुन क्ष किरण उपकरणांवरील अबकारी कर रचनेमध्ये सुधारणा केल्याचे दिसून येते. तसेच महिलांमध्ये आढळणा-या सरव्हाकल कॅन्सर च्या रोकथामसाठी लसीकरणावर पण ठोस तरतूद केल्याचे दिसून येत नाही. महाराष्ट्र राज्य सर्वात जास्त महसूल केंद्राला देते परंतु मुंबई व महाराष्ट्राकडे केंद्राने डोळेझाक केल्याचे दिसते.
मराठवाड्यातील सिंचनासाठी तुटपुंजी तरतूद केल्याचे दिसून येते तर रेल्वे क्षेत्राकडे संपूर्ण दुर्लक्ष दिसते. उलटपक्षी आंध्रप्रदेश व बिहारसाठी भरभरून अर्थिक तरतूद करून झूकते माप दिल्याचे दिसून येते. मध्यमवर्गीय व नोकरदारांना ब-या पैकी करसवलत दिल्याचे दिसून येते. एकंदरीत सदरील अर्थसंकल्पाने सार्वजनिक आरोग्य आणि महाराष्ट्राचा भ्रमनिरास केल्याचे दिसून येते.