धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात सध्या दरोडे, चोरी, लुटमार याचे सत्र सुरू झाले असून, नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.धाराशिव शहरातून जाधववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंबेहोळ येथील एका दामपत्यावर चाकू हल्ला करून लुटण्यात आले.

चांद साबू सय्यद व त्यांची पत्नी अशिबा चांद सय्यद हे धाराशिव येथून अंबेहोळ येथे दुचाकीवर गावी जात असताना त्यांना 3-4 तरूणांनी 2 दुचाकीवर येत गाडी आडवी करून यांच्यावर हल्ला करून लुटमार केली. सय्यद यांच्याकडील 10 हजार व सोन्याचे दागिने लुटून हे चोर फरार झाले. सय्यद यांच्या पत्नीच्या हाताला चाकू लागला असून, त्या दोघांवर धाराशिव येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.


 
Top