धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील कामेगाव येथील होलार समाजाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहासाठी या भजनी मंडळास कामेगावचे सुपूत्र तथा अणगर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले विशाल नानासाहेब कदम पाटील यांच्या वतीने रविवारी 28 जुलै रोजी स्पिकर संच भेट देण्यात आला. तसेच सप्ताह समाप्ती दिवशीचे अन्नदान करण्याचीही जबाबदारी घेतली आहे.
कामेगाव येथील होलार समाज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरवात संत ज्ञानेश्वर माउली यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब पाटील, मनोज पाटील, सदस्य नितीन मोरे, बिरू शेवाळे, राहुल कदम, दैनिक एकमतचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी मच्छिंद्र कदम, नामदेव झोरे, प्रविण कदम, कुमोद मुंड, अरविंद पाटील, विजय गुळीग, जितेंद्र जावीर, लक्ष्मण हात्तीकर, शिवाजी होनमाने, हनमंत हात्तीकर, लिंबराज जावीर, संदीपान होनमाने, बप्पा गुळीग, रामभाउ होनमाने, महादेव केंगार, आकाश आयवळे, वनमाला कांबळे, कमल गुळीग, मंगल होनमाने, पार्वती गुळीग, फुलचंद रणदिवे, केंगार, धीरज गायकवाड, सुरेश जावीर आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रा. विशाल कदम यांनी स्पिकर संच देण्यामागची भूमिका यावेळी ग्रामस्थांसमोर स्पष्ट केली.