कळंब (प्रतिनिधी)- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस एक ऑगस्ट 2024 रोजी साजरा करायचा आहे. त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यानिमित्ताने पिंपरी(शी) ता.कळंब जिल्हा धाराशिव या गावामध्ये गो ग्रीन धाराशिव अध्यक्ष संजीव पांडुरंग पाडे यांनी रुपये 80 हजार एवढ्या रकमेचे 400 केशर आंबा रोपे वितरित केलेली आहेत. 

सर्वजण ही रोपे एक ऑगस्ट दिवशी म्हणजेच मनोज जरंगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त लावून त्याचा एक सेल्फी फोटो घेऊन तो फेसबुकला पोस्ट करणार आहेत. त्या निमित्ताने नैसर्गिक वातावरण तसेच मानसिक वातावरण एकोप्याचं होणार आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी (शी) या शाळेमध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना एक केशर आंबा रोप देऊन ते लागवड करून जोपासण्यासाठी जिम्मेदारी दिलेली आहे. ज्यांनी हे रोप एक वर्षानंतर चांगल्या प्रकारे वाढवलेले आहे त्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा निसर्गा विषयी आपुलकी राहील आणि निसर्ग प्रेम वृद्धिगत होईल व पिंपरी गाव निसर्ग रम्य  दिसणार आहे. या कार्यक्रमाला सरपंच सुग्रीव पाडे, ग्रामसेवक मानकरी व गावातील नागरिक अशोक पाडे, अनुरथ पाडे, ज्ञानोबा पुदाले, अरुण पाडे, लक्ष्मण पाटील, भाऊ मामा नरवडे, विश्वंभर पाडे, भामाबाई राऊत, राजाभाऊ नरवडे व सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top