ढोकी (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलीत तेरणा साखर प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी सौ रेखाताई सुरेश कदम यांची मतदानाद्वारे शनिवार दि.13 रोजी  निवड करण्यात आली.

तेरणा साखर प्रशालेतील मागील शाळा व्यवस्थापन समितीची मुदत संपल्यामुळे  सन 2024 -2025 ते 2025-26 या दोन शैक्षणिक वर्षासाठी  नवीन समितीच्या निवडीसाठी पालकांची बैठक मुख्याध्यापक संजय पाटील यांनी तेरणा प्रशालेत शनिवार दि.13 रोजी बोलावली होती. यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे तेरणा कारखान्याचे अवसायक विजय घोणसे तर सचिव म्हणून प्रशाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील हे दोन पदे कायम आहेत. तर उपाध्यक्ष पद हे पालकामधून निवडले जाते. उपाध्यक्ष पदासाठी दोन महिला व दोन पुरुष इच्छुक असल्यामुळे या वेळी सर्वानुमते मतदान घेण्याचा  ठराव घेण्यात आला. यामध्ये महिलामधुन उपाध्यक्ष पदासाठी रेखाताई सुरेश कदम व स्वाती गणेश इंगळे यांनी तर पुरुषामधून नासिर शेख व अरुण डोलारे हे 4 जण उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. या वेळी गुप्त मतपञिकेद्वारे मतदान घेण्यात आले. या झालेल्या अटीतटीच्या व चुरशीच्या लढतीमध्ये  रेखाताई कदम यांना 12 मते तर स्वाती इंगळे यांना 10, नासिर शेख 8, अरुण डोलारे 2 मते प्राप्त झाली. या अटीतटीच्या लढतीत रेखाताई सुरेश कदम यांना 12 मते पडल्याने त्यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून शिक्षण तज्ञ माजी मुख्याध्यापक पाडुरंग वाकुरे, शकील काझी, अंकुश जाधव, महादेव गाढवे, महिला प्रतिनिधी मिनाक्षी लांडगे, आशा बनकर व सुर्वणा कोळी यांची उपस्थित पालकांमधून निवड करण्यात आली. नुतन समितीचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पालक तथा पञकार सुरेश कदम,शशीकांत भुतेकर,पालक भारत देशमुख, संजय जाधव ,पुरुषोत्तम बाहेती,पोलिस पाटील राहुल वाकुरे,बबन देशमुख,सरकार देशमुख,जिवन कावळे,सुनिल थोरात,थोडसरे,शिक्षक चौरे,चव्हाण यांच्यासह पालक उपस्थित होते. आज वर कधीच उपाध्यक्ष म्हणून महिलेला या पदावर काम करण्याची संधी मिळाली नव्हती. मी माझ्या पदाचा योग्य उपयोग करत शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच पालक व शाळा या मध्ये समन्वय साधण्यासाठी पूर्ण वेळ काम करेल व विद्यार्थी यांच्या गुणवत्ता वाढीसाठी योग्य पद्धतीने नियोजन करून मी माझे कार्य पार पाडीन असा विश्वास नूतन उपाध्यक्ष रेखाताई कदम यांनी व्यक्त केला.


 
Top