वाशी (प्रतिनिधी)-  महाराष्ट्रातील लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना जाहीर करावी याबाबतचे निवेदन येथील व्यापारी संघटनेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना वाशीचे तहसीलदारांमार्फत दि. 24 जूलै रोजी देण्यात आले. सदरचे निवेदन नायब तहसीलदार भोसले यांनी स्वीकारले आहे. 

महाराष्ट्र शासनाने नुकतीच लाडकी बहीण व लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील व्यापाऱ्याकडे शासनाने लक्ष द्यावे व महाराष्ट्राच्या लाडक्या वापाऱ्यांसाठी पेन्शन योजना त्वरीत जाहीर करावी. व्यापारीसुद्धा या समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. व महाराष्ट्र शासनाचा आर्थिक कणा आहे. शासन राबवत असलेल्या योजनांचा पैसा व्यापाऱ्यांमार्फतच विविध प्रकारचे कर गोळा करून शासनाच्या तिजोरीत भरल्यामुळे चालु आहे. जी.एस.टी., इन्कम टॅक्स, प्रोफेशन टॅक्स, वेट ॲन्ड मेजरमेंट टॅक्स, फुड लायोनेल फीस, शॉप ॲक्ट फीस, तसेच इतर वेगवेगळया टॅक्सच्या माध्यमातुन पैसा व्यापारी गोळा करून इमाने इतबारे शासनाला देत आहेत. परंतु त्याच व्यापाऱ्याच्या कल्याणासाठी शासनाने आजपर्यंत एकही योजना काबवलेली नाही. व्यापारात नुकसान झाल्यास किंवा एखाद्या व्यापाऱ्याचे अपघाती निधन झाल्यास त्याचा पुर्ण परिवार रस्त्यावर येतो. अशा व्यापाऱ्यांना शासनाकडुन कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे यापुढे शासनाने व्यापा-यांसाठी पेन्शन योजना जाहीर करून व्यापा-यांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर पन्नासावर व्यापा-यांच्या स्वाक्ष-या आहेत.

यावेळी व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष मुकूंद शिंगणापूरे, सचिव प्रविण पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत मोळवणे, प्रभाकर भांडवले, बाळासाहेब शेरकर, किरण कवडे, निवांत काळे, विशाल महामुनी, विठ्ठल महामुनी, राजेंद्र जोशी, सतिश जुगार, प्रशांत बावगे, बासिद मुजावर अव्वल कारकून तवले यांची उपस्थिती होती.

 
Top