तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हयातील ग्रामपंचायत सदस्यांचे सुमारे 3,38,78,000/- इतका भत्ता जि. प. कडे प्रलंबीत तो तात्काळ वितरीत करावा अन्यथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना समोर आंदोलन करण्याचा इशारा शिव अल्पसंख्याक सेना जिल्हा प्रमुख अमीर शेख यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कार्यालय, धाराशिव.यांना देवुन दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, तुळजापुर तालुका व सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांचा बैठक भला शासनाकडे |जिल्हा परिषद कडे प्रलंबीत आहे. सन 19-20, 20-21 व 21-22 पंचायत समिती, तुळजापूर तिन्ही वर्षांचे मिळून 3,38,78,000, (तिन कोटी अडोत्तीस लाख अत्याहत्तर हजार रूपये) ग्रामपंचायत सदस्यांना वाटप झालेले नाहीत. जिल्हा प्रशासनकडे निधी उपलब्ध होऊनही पैसे का वितरीत करीत नाहीत. असा सवाल करुन कृपया आठ
दिवसात निधी वितरीत करावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालमासमोर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावे असे निवेदनध्दारे इशारा दिला आहे.
ग्रामपंचायत संख्या 623
ग्रामपंचायत सदस्य संख्या 15224
सदस्यांचे मासीक सभांना उपस्थितीत 1,69,390
आवश्यक निधी 3,38,78000 रुपये.