भूम (प्रतिनिधी) - सालाबाद प्रमाणे याही वर्षे भूम शहरातील शासकीय विश्रामगृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती उत्सव समितीची बैठक घेण्यात आली. बैठक ही दत्ता भानुदास साठे  यांच्या अध्यक्षतेखालील बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी प्रदीप अनंत साठे, उपाध्यक्षपदी नितीन पांडुरंग साठे, कोषाध्यक्षपदी किरण महादेव साठे, सचिवपदी सचिन महादेव साठे यांची निवड करण्यात आली. 

यावेळी मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम  साजरे  करण्याचा ठराव संमत करण्यात आला. यामध्ये अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबीर , गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर वाटप, वृक्षारोपण, आदि कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठकीस गणेश गौरीशंकर साठे, शैलेश कांता साठे, सचिन अण्णा साठे, नितीन कचरु साठे, हरी भगवान लोंढे, सोहन हनुमंत साठे, ओंम गणेश साठे, उमेश नारायण साठे, प्रवीण साहेबराव साठे, सुरज संभाजी साठे विनोद उत्तम दुबळे, गणेश भाऊराव साठे, रोहन आडागळे, अभिमान श्रीरंग साठे, अभिजित साठे, सागर मिसाळ, उमेश साठे, विकास अंगद देवधरे, अमोल नारायण साठे,आदि समाजबांधव उपस्थित होते.

 
Top