धाराशिव (प्रतिनिधी)- भाई उद्धवराव पाटील हायस्कूल तुगाव (ढोकी) तालुका धाराशिव येथील इयत्ता 8वी चा विद्यार्थी पियुष प्रदीप कोकाटे हा 8 वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यात 18 वा. तर तालुक्यात 7 वा गुणवत्ता यादीत आला आहे.

त्याच्या यशाबद्दल मुख्याध्यापक राम जगताप ,सहशिक्षक सुनील गव्हाणे, लहू शिंदे, बालाजी तांबे, हबीब शेख, विलास जेवे, ज्ञानदेव जोंधळे लिपिक धोंडीराम हाजगुडे, पालक प्रा. प्रदीप कोकाटे व भावना चौधरी- कोकाटे यांनी परिश्रम घेतले. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत हाजगुडे, सचिव विठ्ठल आक्रूर हाजगुडे, संचालक ॲड.अविनाश देशमुख यांनी अभिनंदन केले.

 
Top