तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्र तुळजापूर शहरात मोकाट जनावारांचा प्रचंड सुळसुळाट वाढल्याच्या पार्श्वभूमीवर रविवार दि. 28 जुलै रोजी तिर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील मोकाट जनावरे नगर परिषदेने तात्पुरती उपाययोजना म्हणून दिवसभर सातत्याने शहराबाहेर नेवुन सोडुन देण्यात येत आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात जवळपास तीनशे ते चारशे मोकाट जनावरे मंदीर महाध्दार परिसर मंदीराकडे येणारे रस्ते महामार्ग रस्ता आठवडा बाजार वाहनतळे येथे फिरत आहेत. मंदीर परिसरात ही अनेक मोकाट जनावरे फिरत असुन हे जनवारे व्यापारी वर्गातील दुकानात मांडलेल्या प्लास्टिक प्रसाद चिरमुरे पुढे खात आहेत. काही जनावरे खायला नाही मिळाले कि हिंसक होवुन यात भाविक जखमी होत आहेत.
सध्या पावसाचे दिवस असल्याने हवेत थंडी असल्याने महामार्ग रस्ता पाऊस पडताच लगेच कोरडा होत असल्याने यावर मोकाट जनावरे बसतात. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या धुरामुळे गरम हवा येत असल्याने महामार्ग रस्त्यावर मोकाट जनावरे बसण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्ग रस्त्यावर बसलेल्या जनावरांचा पाया वरुन वाहने जात असल्याने अनेक जनावरे जखमी झाले. यातील काही जनावरे भाजीमंडई टाकुन दिलेली भाजी, रस्त्यावर पडलेले विविध पदार्थ अगदी प्लास्टिक सुध्दा खात आहेत. मोकाट जनावारांचे मालक दिवसा जनावरे गावात सोडुन देतात व हे सांयकाळी परत येत असल्याने मोकाट जनावरे सोडण्याचा प्रमाणात वाढ झाली आहे. मोकाट जनावरे मालकांनी आपली जनावरे शहरात सोडू नये अन्यथा ते गोशाळेत पाठवण्यात येईल असा इशारा नगर परिषद ने दिला आहे.