तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. 27 जुलै रोजी तुळजापूर न्यायालयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये 771 प्रकरणात तडजोड होवुन फिर्यादी पक्षाची रुपये 19 लाख 68 हजार 701 व दावा पुर्व प्रकरणांमध्ये रूपये 43 लाख 83 हजार 253 रूपये रक्कमेची संबंधीत नगरपरिषद, बँक, ग्रामपंचायतीला वसूली झाली.
तुळजापूर मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी ठिक 10.15 वाजता एम. एम. निकम, दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तुळजापूर, यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने लोकअदालतीचे उद्घाटन झाले. यावेळी पी. एस. जी. चाळकर सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर तुळजापूर, के. एस.
कुलकर्णी 2 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर तुळजापूर, ॲड. बी. सी. देशमाने, अध्यक्ष विधीज्ञ मंडळ, तुळजापूर व सर्व सदस्य, विधिज्ञ मंडळ, तुळजापूर रविंद्र खांडेकर पोलीस निरीक्षक तुळजापूर, शैलेश पवार सहा. पोलीस निरीक्षक तामलवाडी, विजय आटोळे सहा. छोलीस निरीक्षक नळदुर्ग, सरकारी वकील अमोघसिध्द कोरे तसेच सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कर्मचारी, सर्व न्यायीक कर्मचारी, पोलीस कर्मचारी, बँक अधिकारी व कर्मचारी, हायवे पोलीस नळदुर्ग
येथील पोलीस कर्मचारी, पक्षकार व त्यांचे विधीज्ञ मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर लोकअदालतीमध्ये तुळजापूर तालुक्यातून मोठया संख्येने प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरुपाची अशी एकुण 846 व दावा पुर्व एकुण 4104 अशी एकुण 4950 प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरीता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या 114 प्रकरणांमध्ये तसेच वाद पुर्व प्रकरणांमध्ये 657 अशी एकुण 771 प्रकरणामध्ये तडजोड झाली. धनादेश अनादर प्रकरणी फिर्यादी पक्षाला रुपये 19 लाख 68 हजार 701 रूपयांची वसूली झाली. दावा पुर्व प्रकरणांमध्ये रूपये 43 लाख 83 हजार 253 रूपये रक्कमेची संबंधीत नगरपरिषद, बँक, ग्रामपंचायतीला वसूली
झाली. त्याचबरोबर किरकोळ फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये आरोपींना दंडात्मक शिक्षा होवून रक्कम 42 हजार 400 रूपये इतका दंड करणेत आला. प्रलंबित बँकेच्या दिवाणी दाव्यातील रक्कम 8 लाख 23 हजार 390 रूपये तडजोडीअंती वादी यांना मिळाली. सदर लोक अदालतीस पक्षकार, विद्यीज्ञ, बॅक
कर्मचारी, तसेच ग्रामपंचायत व नगर परिषद कर्मचारी यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तुळजापूर न्यायालयातील सर्व न्यायीक वर्ग, न्यायालयीन कर्मचारी, तुळजापूर विधीज्ञ संघाचे सर्व सदस्य, तुळजापूर पोलीस ठाणेकडील न्यायालयात नेमणूक असलेले पोलीस कर्मचारी यांनी सदर लोकअदालत यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले.,