तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असले काक्रंबा येथे नेपाळी तरुण देशी, विदेशी सिलबंद 22 बाटल्या किंमत 1720 रक्कम सह जप्त केल्या. सदरील कारवाई शनिवार दि. 27 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता करण्यात आली.
काक्रंबा गावाजवळ अवघ्या सहा किलोमीटर अंतरवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मंदीर असुन येथे नेपाळी तरुन दारुच्या बाटल्यासह पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काक्रंबा बीट अमंलदार कर्तव्य बाबतीत आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा मुळाशी जाणे गरजेचे बनले आहे. तुळजापूर- लातूर रस्त्यावर काक्रंबा येथे मोठ्या प्रमाणात अवैध रित्या दारु विकली जाते. तसेच मटका गुटका ही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. या पार्श्वभूमीवर तुळजापूर पोलिस ठाण्च्याया पथकाने महाराष्ट्र हॉटेल शेजारी काक्रंबा येथे छापा टाकला असता जित बहादुर कामी, वय 28 वर्षे, रा. अत्तरीया देश नेपाळ ह.मु. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव हा शनिवारी दुपारी 3.30 वा. महाराष्ट्र हॉटेल शेजारी काक्रंबा येथे अंदाजे 1720 किंमतीच्या देशी विदेशी 22 सिलबंद बाटल्या सह जप्त करण्यात आल्या.