कळंब (प्रतिनिधी)- शहरात कोंचींग क्लासेसचा प्रंचड सुळसुळाट वाढुन याचे लोण आता ग्रामीण भागात पोहचले आहे. या कोचींग क्लासेसवाल्यांकडुन चांगले गुण मिळवुन देणार अशी आश्वासने देत पालकांकडुन अवाची सवा फिस रुपात लुट करित असल्याने दुष्काळात हे कोंचींग क्लासेस पालकांसाठी तेरावा महिना ठरत आहेत.
संविधानात कलम 45 अन्वये 6ते 14 वर्षचा मुलांना मोफत शिक्षण सक्तीचे असताना शासनाने 16 वर्षाचा मुलांना क्लासेस मध्ये प्रवेश बंदी असताना या बंदीस न जुमानता क्लासेस वाले माञ पैसे घेऊन शिक्षण सर्रास देत आहेत. शिक्षण खात्यातील संबंधित अधिकारी वर्गाचा यास मुक पाठींबा तर नाही ना असा सवाल केला जात आहे.
चांगल्या गुण, नोकरी शाश्वती सह अनेक आश्वासने देवुन पालकांची मानसिकता क्लासेस मध्ये घालण्याची तयार करतात. या क्लासेस मध्ये शिकवणारा पदवी पास व त्या विषयात तज्ञ असावा लागतो. पण हे आहे का याची गुणवत्ता तपासणीच होत नाही. मुले क्लासेसमध्ये यावेत म्हणून क्लासेस वाले शहरात होर्डींग लावुन गुणवत्ता पुर्ण उच्च शिक्षण, सेवा सुविधा, तज्ञांचे मार्गदर्शन म्हणून जाहीरात बाजी करतात. हे या क्लासेसमध्ये मिळते याची तपासणी कोन करते याचा मागमुस लागत नाही. यावर आळा घालणे गरजेचे बनले आहे. सेवा सुविधा, वसतीगृह शुल्क याची शासनाने तपासणी करणे गरजेचे आहे. ज्ञानमंदीराचे बाजरी करण न होणे गरजेचे बनले आहे. आज क्लासेस वाले साने गुरुजींचे नाव घेवुन नाणे गुरुजी बनले आहेत. या व्यवसायात प्रचंड आर्थिक उत्पन्न असल्याने क्लासेस वाले मालामाल व विध्यार्थींचे पालक माञ कंगाल होत आहेत.
एखाद्या मुलाने चांगले गुण मिळवले त्यात शाळा शिक्षकांचा वाटा असणार. पण हे गुण आमच्या क्लासेसमुळे मिळाल्याची जाहीरात करुन शाळेतील शिक्षण बाब गौण करतात व एकच गुणवंत विध्यार्थीं अनेक क्लासेसच्या जाहीरात वर झळकलेले पहावयास मिळते. नियमानुसार असा दावा करता येत नाही पण शिक्षण क्षेत्रातील सिस्टीम भष्ट्र झाल्याने सर्वकाही आलबेल चालु असल्याचे दिसत आहे.
समर व्हँकेशन नावाखाली पालक मुलांची पिळवणूक !
उन्हाळा सुट्टी म्हटले अभ्यास बंद मामाचा गावी जाणे बागडणे मनसोक्त खेळणे पोहणे सह अन्य खेळ खेळणे शिकणे, यामुळे मुलांच्या शारीरिक क्षमता वाढते. पण मुलांचा पालकांना मोठ्या स्वप्न दाखवुन या क्लासेस वाल्याआनी समर व्हँकेशन नावाखाली मुलांच्या सुट्टीचा आनंद हिरावून घेतला आहे. यामुळे बौध्दिक वाढ होत असली तर शारीरिक वाढीचा काय? हा प्रश्न निर्माण होतो आहे.
शहरातुन क्लासेस चा व्यवसाय ग्रामीण भागात फोफावतोय !
क्लासेस वाल्यांनी आपल्या शाखा ग्रामीण भागातक्षी उघडुन तिथे ही शिक्षणाचा व्यवसाय सुरु केला आहे आधीच दुष्काळामुळे उत्पन्न हाती न आल्या ने अर्थिक दृष्ट्या ञस्त बनलेल्या शेतकरी वर्गासाठी हे क्लासेस चे लोण अर्थिक खड्यात घालणारे आहे.