धाराशिव (प्रतिनिधी) - नवी मुंबई व उरण येथे दोन महिलांवर बलात्कार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करून अतिशय क्रूर कृत्य केले आहे. हा खटला अति जलद न्यायालयासमोर चालवून त्या भगिनींना न्याय मिळावा. तसेच त्या सर्व आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी जिल्हा विधिज्ञ मंडळाच्यावतीने कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना दि.30 जुलै रोजी निवेदननिवेदन दिले. 

नवी मुंबई व उरण येथे दोन महिलांवर बलात्कार करून त्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुंबई सारख्या शहरात अशा प्रकारे महिलांची हत्या करून तिच्या प्रेताचे गुप्तांग कापून शरीराला छिन्न विछिन्न करण्याच्या हृदय हेलावून टाकणारा, काळीज पिळवटून टाकणारा विचित्र व अतिऐ घृणास्पद प्रकार घडला आहे. यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, त्या आरोपीस व नवी मुंबई येथील घटनेतील सर्व आरोपींना अति जलद न्यायालयासमोर खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी व त्या घटनेतील मयत महिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. 

शालेय शिक्षणापासुन ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी व मुलींना स्वरक्षणाचे शिक्षण व प्रशिक्षण मोफत आणि सक्तीचे करून तसे सर्व शाळा, कॉलेज देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. या आंदोलनामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ विजयकुमार शिंदे, ॲड. भाग्यश्री रणखांब, ॲड. श्रीदेवी बळे - मुसळे, ॲड. विशाखा माळी, ॲड विजया भोसले, शिला उंबरे, संगीता काळे, संजना दुरुगकर, ॲड. श्वेता दुरुगकर, सोनाली भोसले, ॲड. ज्योती बडेकर, ॲड अश्विनी सोनटक्के, ॲड. झीनत प्रधान, ॲड आर.बी. तांदळे, ॲड तेजश्री पाटील, ॲड नीता अंधारे, ॲड हनुमंत बिक्कड, ॲड पांडुरंग लोमटे, ॲड नितीन भोसले, ॲड.अविनाश देशमुख, ॲड. रवींद्र कदम, ॲड.गिरवळकर, ॲड. धनंजय धाबेकर, ॲड. किरण चादरे, ॲड. अविनाश गरड, ॲड. धैर्यशील सस्ते, ॲड. तेजश्री प्रधान, ॲड. आपचे, ॲड. महेश गायकवाड, ॲड. व्ही.यु. शेलार, ॲड. प्रसाद कानडे, ॲड. अजय पाटील आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top