भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील वरुड येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण बुरटे यांनी स्वतःच्या शेतात स्वखर्चाने 700 फूट पाठवणामध्ये दहा फुटाच्या खोल खड्डा घेऊन चारी खोदल्या असून पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम राबवली आहे. या पाठवाणाच्या बाजूला भूम येथील प्रगतशील शेतकरी श्रीराम मुळे व त्यांच्या सहकार्याच्या असते 100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामध्ये कवट, जांभळ, आंबा व इतर वृक्षांचे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रवीण बुरटे, सुधीर देशमुख, भगवान देशमुख, प्रशांत बुरटे आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.