तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरात सर्वत्र खासगी क्लासेसचा सुळसुळाट झाला आहे. कोचिंग क्लासेसची गगनाला भिडलेली फी यात पालकांचे बजेट पूर्णतः कोलमडत आहे. याला संस्था आणि शाळांचा आधार असल्याने खासगी क्लासेसचे पेव फुटले आहे. दर्जेदार सोयीसुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण असलेल्या खासगी मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये पाल्य शिक्षण घेत आहेत. तरीही पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी कोचिंग क्लासेसचा आसरा का घ्यावा लागतो. मग गुणवत्ता नक्की कोण देत आहे, शाळा की क्लासेस? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासह खासगी क्लासेसवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न व्हावा, अशी मागणी होत आहे.

एवढेच नव्हे, तर शहरात ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर झळकावून विविध क्लासेसकडून विद्यार्थी केवळ आमच्यामुळेच यशस्वी झाला, याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण करताना दिसून येत आहेत. याकडे विविध संस्था - शाळा दुर्लक्ष करीत असल्याने पालकांकडून हजारो रुपये फी आकारून क्लासेसच्या माध्यमातून सर्वसामान्य पालकांची आर्थिक लूट सुरू आहे. शैक्षणिक संस्थेपेक्षा क्लासेसचा मोठा वाटा असल्याचा आविर्भाव अनेक क्लासेस चालकांना आहे. क्लास चालक परवानगी न घेता डिझीटल लावत आहेत. याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहे.

शासनाने या खासगी क्लासेसना निर्बंध नसल्याने एकंदर दर्जेदार शिक्षण घेणे ही श्रीमंतांचीच बाब झाली आहे का? हा प्रश्न पालकांना विचार करण्यास भाग

पाडत आहे. शाळांप्रमाणेच क्लासेसच्या शुल्कावर कोणतेही नियंत्रण नाही. क्लासेस म्हणतील ती रक्कम पालक देण्यास तयार होतात. ही खासगी क्लासेसद्वारे होणारी पिळवणूक रोखण्यासाठी शासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे. आहे. यामध्ये शैक्षणिक संस्था परवानगी असूनही नावारूपाला येताना दिसून येत नाही. खासगी क्लासेसमध्ये डी.एड., बी.एड. न झालेले शिक्षक असतात. तरीही क्लासेस हाउसफुल्ल असतात. या शिक्षकांनी शिकविलेले मुलांना नीट समजते का, केवळ याच निकषावर शिक्षकांची क्लासेसमध्ये नियुक्ती होते. याउलट शाळांमधील उच्चशिक्षित असूनही शिक्षक मुलांना क्लासेसमध्ये घालण्याची

वेळ पालकांवर येते, ही शोकांतिका आहे.


 
Top