तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्र तुळजापूरात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक सेवा सुविधांसह नवीन बसस्थानक काम प्रगती पथावर असुन लवकरच हे बसस्थानक लाखो प्रवाशी भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहे. हे बसस्थानक प्रशिस्त सेवासुविधायुक्त असल्याने भाविकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
तिर्थक्षेत्र तुळजापूरला अद्याप रेल्वे आली नसल्याने सर्वसामान्य गोरगरीब, मध्यमवर्गीय भाविकांना बस हेच माध्यम तिर्थक्षेञ येण्यासाठी एकमेव कमी खर्चाचे साधन असल्याने येथे चोवीस तास प्रवासी भाविकांची वर्दळ असते. श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येण्यासाठी येथील बसस्थानक मेट्रोपाँलिटन सिटी सारख्या दर्जाचे बांधले जात आहे. या नव्या होत असलेल्या बसस्थानकामुळे लाखो भाविकांची सोय होणार असुन हे बसस्थानक तिर्थक्षेत्र तुळजापूरच्या सौदर्यात भर घालणारे ठरणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ वर्षानुवर्षे भक्त संख्या प्रचंड वाढत आहे. श्रीतुळजाभवानी मंदीर दहा मिनीटाचा अंतरावर असलेल्या ठिकाणी जुन्या बसस्थानक जागेवरच प्रशिस्त असे नवे बसस्थानक उभारले जात आहे. या बसस्थानक प्रवेशव्दाराला पुरातन लुक देण्यात आला आहे. विशेष म्हणजे येथे दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा देण्यात आली आहे.
या बसस्थानकासाठी पुर्वी पेक्षा दुप्पट उपलब्ध जागा घेण्यात आली. येथे 315 फुट लांबीचा भव्य असा प्लँटफार्म एरिया असुन येथे प्रवाशांना बसण्यासाठी सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. पुर्वी या बसस्थानकातुन चारशे फेऱ्या होत होत्या. आता याची मोठ्या प्रमाणात मर्यादा वाढवली आहे. विशेष म्हणजे येथे अपंग प्रवाशांसाठी स्वतंत्र शौचालय तयार करण्यात आले असुन येथे व्हील चेअर वरुन जाण्या-येण्यासाठी रँम्पची सोय केली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक सेवा सुविधासह जुन्या बसस्थानक ठिकाणी नवे बसस्थानक बांधकाम सुरु असुन याचे काम प्रगतीपथावर आहे.