धाराशिव/ तुळजापूर (प्रतिनिधी) -मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीवर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी संभ्रमाची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना व काँग्रेसने आपला पक्ष जरांगे यांच्या मागणीच्या बाजूने आहे की विरोधात आहे हे सांगावे. सर्व पक्षांनी स्पष्ट भूमिका मांडली तरच तोडगा निघणार आहे असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. रविवार दि. 28 जुलै रोजी रात्री उशिरा ॲड.आंबेडकर यांची सभा धाराशिव येथे झाली. 

सोमवारी प्रकाश आंबेडकर यांची तुळजापूर येथे प्रचंड जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर, ॲड. भोसीकर रमेश बारसकर, डॉॅ. नितीन ढेपे, बालाजी कोमठी, डॉ. स्नेहा लोंखडे. मिलींद रोकडे, प्रविण रणबागुल, बी. डी. शिंदे, जीवन कदम, उमेश  खांडेकर, बालाजी घोगरे यावेळी व्यासपीठावर उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले कि,  7 आँगस्ट ओबीसीच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे सगळे कामे बाजूला ठेवुन 7 आँगस्टला औरंगाबाद येथे होणाऱ्या एसटी, एससी, ओबीसी आरक्षण बचाव रँलीला उपस्थितीत राहुन ओबीसीची  ताकद दाखवा असे आवाहन केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ओबीसी समाजाला 50 टक्के उमेदवारी देणाऱ्या पक्षाला आमचा पाठिंबा राहणार आहे. 100 ओबीसी आमदार निवडून आले तरच ओबीसीचे आरक्षण टिकणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतुन ओबीसीची ताकद  दिसण्यासाठी काम करा. ओबीसीचा वापर राजकिय पक्ष निश्चीत करतील तो होवु देवु नका. यासाठी औरंगाबादला होणाऱ्या सांगता रँलीस सहभाग नोदवा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी शेवटी केले.

 
Top