धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता रवाना होवून वडगाव सिध्देश्वर येथे आले असता पथकास पोलीस ठाणे आनंदनगर गुरनं 219/2024 कलम 262 बीएनएस या गुन्ह्यामधील आरोपी नामे अजित धनाजी बोंदर, वय 26 रा. उत्तमी कायापुर ता. जि. धाराशिव हा त्याचे शेतात आहे अशी गोपनिय बातमी मिळाल्याने पथकाने लागलीच नमुद ठिकाणी जावून नमुद आरोपीस ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे,  सचिन खटके, पोह हुसेन सय्यद, जानराव, पोना  जाधवर, रवींद्र आरसेवाड, चालक चैरे यांच्या पथकाने केली आहे.

 
Top