ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव येथे दि.10 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण व जनजागृती व शांतता रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून लाखो मराठे बांधव सहभागी झाले होते. या प्रसंगी मौजे तुगांव ता. जि. धाराशिव येथील विध्यार्थी आदर्श सचिन लोमटे याने महानायक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे रेखाटलेले हुबेहूब पेन्सिल स्केच चित्र भेट दिले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी चित्र पाहताच खूप छान म्हणत कौतुकाची थाप टाकत आदर्श तुझी कला अप्रतिम आहे असं म्हणत त्याचे विशेष अभिनंदन केले.