कळंब (प्रतिनिधी)-कळंब तालुका माजी सैनिक संघाच्यावतीने व आदर्श विचार मंच यांच्या पुढाकाराने  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा येथे 101 वृक्षाची लागवड करण्यात आली.

दि.9 जुलै रोजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात विभागात प्रथम आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा येथे कळंब तालुका माजी सैनिक संघ यांच्या वतीने व आदर्श विचार मंच भाटशिरपुरा यांच्या सहकार्यांने  शाळेच्या मैदानात 101 वृक्षाची लागवड करण्यात आली.

याप्रसंगी  सरपंच सुनिता वाघमारे, उपसंचालक तथा आदर्श विचार मंचाचे अध्यक्ष सुर्यकांत खापे, जेष्ट माजी सैनिक सोनाजी राजे, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी सैनिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सत्यनारायन पुरी, ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड, अंकुश तांबारे, के.के.जोशी, यु.बी.काळे, बालासाहेब हुंडे, चंद्रकांत डांगरे, बाबु बासू मिया शेख, लहु जाधवर, रविंद्र जाधव, अर्जुन लाखे, आण्णासाहेब लोमटे, सुभाष पवार, दिलिप पावले, सोमनाथ देशमाने, अरुण भोरे, शफुद्दीन शेख, श्रीमंत भराटे, या माजी सैनिकासह कोंडीबा कदम, अमोल सिरसट, बलभिम पवार, आसिफ शेख, विकास गायकवाड, मनोहर गायकवाड, बलभिम सावंत, मनोज गायकवाड, शाहु सावंत, प्रशांत गायकवाड यांच्यासह गावातील नागरीक  मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

यावेळी गावातील आदर्श विचार मंचाच्या वतीने सर्व माजी सैनिकांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे, शिक्षक अमोल बाभळे,श्रीकांत तांबारे, सचिन तामाने, शहाजी बनसोडे, राजाभाऊ शिंदे, लिंबराज सुरवसे, श्रीमती प्रमोदिनी होळे, श्रीमती रंजना थोरात यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रतिक गायकवाड यांनी तर सुत्रसंचलन आदर्श विचार मंचाचे अध्यक्ष सुर्यकांत खाते तर आभार रमेश रितपुरे यांनी मानले.

 
Top