कळंब (प्रतिनिधी)- प्रियदर्शनी अर्बन को. ऑप . बँक लि . धाराशिव शाखेचे उद्घाटन सोहळा दि . 18  धाराशिव शहरात पार पडला .  या बॅकेच्या  5 व्या शाखेचा उद्घाटन सोहळा बीड लोकसभेचे  खासदार बजरंग  सोनवणे, धाराशिव लोकसभेचे  खासदार ओमराजे निंबाळकर,कळंब धाराशिव मतदार संघाचे  आमदार कैलास  पाटील, जिवनराव गोरे  यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी बँके माहिती व प्रस्तावना बँकेचे चेअरमन प्रा. श्रीधर भवर यांनी यावेळी उपस्थित त्यांना दिली. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व ओबीसी विकास महामंडळाच्या सर्वाधिक फाईल वाटप करण्याचा विक्रम आपल्या बँकेने केला  आहे.त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी  बँकेचे कौतुक केले . 

याप्रसंगी  बाळकृष्ण भवर, शरद दाताळ, मधुकर बोंदर,  जालिंदर वाघमारे, बापू शेळके,  नितीन बागल,  दयानंद पाटील, तुषार वाघमारे , मारुती देशमुख,  नवनाथ तवले, सतीश मातने,  अमृत जाधव, घुटे , प्रशांत कवडे,शेखर घोडके,  रमेश देशमुख ,गाढवे , नितीन भवर, यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य  तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप शिंदे, जनरल मॅनेजर आशिष हेड्डा, कर्ज वसुली अधिकारी संतोष गायकवाड , दिलीप देवकते  यांच्यासह बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top