तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील कामठा  ते वरवंटी दरम्यान माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांच्या शेताजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे आले असून याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियंता उप अभियंता यांचे असेच  दुर्लक्ष राहिले तर माञ हा रस्ता काटेरी झाडीत गडप होण्याची शक्यता आहे.

या वाढत्या झांडान बाबतीत वारंवार सांगूनही अधिकारी हे रस्त्यावरील दुहेरी बाजूचे काटेरी झाडे काढत नाहीत. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात समोरून येणारे वाहन दिसल्यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरील रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


 
Top