तुळजापूर (प्रतिनिधी)-  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्यांक विभाग ॲक्शन मोडवर आला असुन तुळजापूर  विधानसभा व तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, ज्येष्ठ नेते अनिल दादा शिंदे, दिलीप नाना मगर, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष तौफिक शेख यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचे निवडीचे पत्र देण्यात आले. धाराशिव अल्पसंख्यांक विभाग तालुका कार्याध्यक्षपदी अमजद शेख (कनगरा), तुळजापूर तालुका अल्पसंख्यांक विभाग विधानसभा उपाध्यक्षपदी चांद नदाफ (खडकी), तुळजापूर तालुका अल्पसंख्यांक विभाग तालुका उपाध्यक्षपदी जब्बार सय्यद (मसला)यांची निवड करण्यात आली. 

यावेळी माजी सभापती खराडे साहेब, रुबाब पठाण, दिलीप नाना मगर,प्रभारी युवक तालुकाध्यक्ष शरद जगदाळे,कनगर्याचे सरपंच गंगणे, उपसरपंच सुरज इंगळे, लालासाहेब शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहेद भाई शेख, तालुका विधानसभा अल्पसंख्यांक अध्यक्ष इब्राहिम इनामदार,मकसूद शेख, युवा नेते गोविंद देवकर, मोईन शेख लाईक,मुलानी पीर पाशा, लालासाहेब शेख, बाबूलाल शेख, मुख्तार शेख, मेहबूब शेख, सय्यद जब्बार,बाबासाहेब खराडे, असे असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार ध्येय धोरण सामान्य घटकांपर्यंत पोहोचवावे महाविकास आघाडी तुळजापूर विधानसभे साठी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचे एक निष्ठेने काम करावे असे आव्हान अल्पसंख्यांक विभाग जिल्हा अध्यक्ष तौफिक शेख यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना रुबाब भाई पठाण यांनी केली तर आभार प्रभारी युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे यांनी मानले.

 
Top