तुळजापूर (प्रतिनिधी)- स्ञीशक्तीदेवता श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत महिलांच्या शौचालयासाठी स्वताची जागा उपलब्ध करुन देण्यात विनोद गंगणे नी घेतलेला पुढाकार उपक्रम अभिनव व स्तुत्य असल्याने असाच पुढाकार इतरांनी घ्यावा असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महीलांसाठीचा सुलभ शौचालयाच्या उदघाटन सोहळा प्रसंगी मंगळवार दि. 23 जुलै रोजी केले.

यावेळी युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, अविनाश गंगणे, निलेश रोचकरी, किशोर गंगणे सह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. तिर्थक्षेञी शौचालया बाबतीत महिला भाविकांची होणारी गैरसोय कुंचबना पार्श्वभूमीवर  युवा नेते विनोद पिटु गंगणे यांनी स्वता पुढाकार घेवुन  स्वताची जागा हि महीला सुलभ शौचालयास देण्याचा माणस केला आहे. त्याचे उदघाटन प्राथमीक स्वरुपामध्ये होण्याच्या दृष्टी कोणातुन तेथील नव्याने बांधलेल्या दुकान जागेचे रुपांतर महीलांच्या सुलभ शौचालयामध्ये होणार आहे. त्याचे प्राथमीक स्वरुपामध्ये उदघाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले कि महिलांसाठी शौचालयास आपली मोक्याची जागा देवुन विनोद  गंगणे यांनी एक प्रकारे महिलांचा मदतीला धावले असुन जसे विनोद गंगणे महिला शौचालयासाठी स्वताची जागा दिली. तसाच पुढाकार इतरांनी घ्यावा असे आवाहन करुन हा उपक्रम आर्दशवत अभिनव व स्तुत्य असल्याचे प्रतिपादन आ. पाटील यांनी केले.

येथील शुक्रवार पेठ भागात  युवा नेते विनोद पिटू गंगणे आपल्या मालकिचा जागेतील एक दुकानाचा गाळा महिलांन साठी शौचालय उभारणीसाठी दिला. त्याचे उदघाटन आराणाजगजितसिंहपाटील यांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, आनंद कदले, शांताराम पेंदे, नरेश अमृतराव, किशोर गंगणे, माऊली भोसले, सुहास सांळुके, अविनाश गंगणे, लखन पेंदे, निलेश रोचकरी, इंद्रजित सांळुके, शिवाजी बोदले, बाळासाहेब भोसले, गिरीष देवळालकर, बापु अमृतराव, बालाजी गंगणे, सागर गंगणे, शहाजी भांजी, लोंढे, राम चोपदा, मनोज गवळी, संतोष इंगळेअदिसह भाजप पदाधिकारी सह शुक्रवार पेठ भागातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top