तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील नळदुर्ग स्थित श्री. तुळजाभवानी शेतकरी साखर कारखानाने, शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल देण्याचा मागणीसाठी अमोल जाधव यांनी सोमवार दि. 8 जुलैपासुन तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

या उपोषण स्थळी विविध पक्षसंघटना भेट देवुन पाठींबा देत आहेत.

तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना यांनी तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्याचे ऊसाचे बील मिळत नसल्याने  या मागणीसाठी  19/06/2024 रोजी तुळजापूर येथील जुने बस स्थानक तुळजापूर समोर रास्तारोको करण्यात आले होते. तरीही  आजपर्यंत शेतकऱ्यांची बोल मिळाले नसल्याने सोमवार दि. 8 जुलै रोजी सकाळी 11.00वाजल्या पासुन अमोल शिवाजीराव जाधव यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

 
Top